यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून आज, मंगळवार दिनांक 17, दिनांक १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. ( block for installation of grantee near borghat and khandala on mumbai pune expressway )
दिनांक 17 ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा कि.मी. 47/900 व लोणावळा कि.मी. 50/100 येथे, 18 ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी कि.मी. 44/800 व खालापूर कि.मी. 33/800, दिनांक 19 ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. 37/800 व कि.मी. 37, 26 ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा कि.मी. 47/120 तर खोपोली एक्झीट कि.मी. 39/900 वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे. काम पुर्ण झाल्यावर दुपारी 1 वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवारी खंडाळा आणि लोणावळा येथील ग्रॅन्टीसाठी ब्लॉक….
मंगळवारी (दि. 17 ऑक्टोबर) रोजी दुपारी 12.00 ते 1.00 वाजेच्या दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत km 47/900 व km 50/100 या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. फक्त कार साठी जुना पुणे मुंबई महामार्ग शींग्रोबा घाटातील व द्रुतगती महामार्गावरून मॅजिक पॉईंट – अंडा पॉईंट येथून लोणावळा मार्गे पुन्हा द्रुतगती महामार्गावर सुरू राहील.
अधिक वाचा –
– भिर्रर्र…!! पवनमावळात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा; शिवली गावात ‘बैल पकडण्याची स्पर्धा’ उत्साहात संपन्न
– भाजपच्या मतदार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद; 5700 हून अधिक नवमतदारांची नोंदणी
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास