मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी पुन्हा एकदा ब्लॉक घेतला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव कि.मी 56/900 व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ कि.मी 74/900 इथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू असून मंगळवारी, दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना धरणग्रस्त आज पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखणार; पवनानगरमधून सुरु होणार मोर्चा
– दमदार आमदार…! मावळ तालुक्यासाठी आमदार सुनिल शेळकेंनी आणला तब्बल 428 कोटी 91 लाखांचा निधी
– Breaking! द्रुतगती मार्गावर अपघात, दुधाच्या टँकरवरील चालकाचा जागीच मृत्यू