मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी अर्थात उद्या दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी लोणावळा येथे ग्रँटी बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 या वेळेत जुन्या महामार्गावर वळवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे मार्गिका) लोणावळा एक्झिट (कि.मी क्र.54/225) इथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील. या दरम्यान वाहनधारकांना खंडाळा एक्झिट मार्गे (कि.मी क्र.48/200) जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरुन वळवण येथील पथकर नाक्यावरुन पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरुन जाता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चांगला निर्णय! आदिवासींच्या खेळांना क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणार
– दहावी आणि बारावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना 10 हजार रुपये मिळणार
– दैनिक मावळ विशेष – कर्णवेध संस्कार । कान का टोचले जातात? भिकबाळी का वापरावी? कर्णभुषणे महत्व व परंपरा, वाचा…