राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 24 व्या वर्धापन दिन आणि रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पन निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 76 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. वडगाव शहरात या रक्तदान शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. तसेच यावेळी इयत्ता 10 वी, 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पंचमुखी महाराज मंदिर प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर स्तुत्य उपक्रमास संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेश खांडगे, वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी शुभेच्छा दिल्या, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून पुण्यकर्म करावे असे आवाहन केले. आधार रक्त संकलन केंद्र, पुणे येथील सर्व डॉक्टर्स टीम यांचे रक्तदान शिबिरास सहकार्य लाभले. ( Blood Donation Camp in Vadgaon Maval By NCP Party )
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, जेष्ठ नेते सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर ,नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, रूपाली खैरे, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पुनम जाधव, मिनाक्षी ढोरे, आरती राऊत, सुधा भालेकर, प्रियांका खैरे, व्हाईस चेअरमन प्रकाश कुडे, मा सरपंच पोपटराव वहिले, मा. उपसंरपच पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, राजेश बाफना, शहराध्यक्ष प्रविण ढोरे, किसनराव वहिले, गंगाराम ढोरे, मंगेश काका ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुरेश कुडे, सुधाकर वाघमारे, चंद्रकांत राऊत, लक्ष्मण ढोरे, दिलीपराव वहिले, रोहिदास गराडे,काशिनाथ भालेराव, सोमनाथ धोंगडे, तुषार वहिले, प्रमोद वहिले, शरद ढोरे, गणेश ढोरे, अफताब सय्यद ,शैलेश वहिले, गणेश वायकर, भाऊसाहेब ढोरे, अजय भवार, सौरभ सावले, मयुर गुरव, सिद्धेश ढोरे, गणेश पाटोळे, आशिष भालेराव, अभिजीत ढोरे, कैलास पाटोळे, संदीप भालेराव, गणेश सुतार, प्रणव ढोरे, केदार बवरे, मयुर वाघमारे, रतिश वाघमारे उपस्थित होते.
हेही वाचा – मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा यांच्यावर सरपंच परिषदेकडून मोठी जबाबदारी
कार्यक्रमाचे नियोजन नगरसेविका पुजा वहिले, नगरसेवक मंगेश खैरे, मा उपसरपंच विशाल वहिले यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंकडून पवन मावळातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी; कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना
– “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”