Dainik Maval News : मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सकल मराठा समाज मावळ तालुका व प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने इंदोरी गावातील हनुमान मंदिर हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १०६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. समाजसेवेची प्रेरणा व मानवतेचा संदेश देणारे हे रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. सरपंच दामोदर शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव ढोरे, मा. चेअरमन अरविंद शेवकर, मा. जि.प. सदस्य प्रशांत ढोरे, भाजप नेते मनोहर दिगंबर भेगडे, कामगार नेते रामचंद्र ढोरे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच जयश्री सावंत, मा. उपसरपंच संदीप ढोरे, इंदोरी शहर रा.काँग्रेस अध्यक्ष दिनेश चव्हाण, मा. उपसरपंच आशिष ढोरे, मा. सरपंच प्रदीप काशिद, उद्योजक आतुल मराठे, उद्योजक संकेत शिंदे, खरेदी विक्री संघाचे संचालक निलेश मराठे, मा. सभापती ज्योतीताई शिंदे, मा. सरपंच शोभाताई शिंदे, ग्रा.पं. अध्यक्ष वर्षाताई नवघणे, मा. पं.स. सदस्य लीलाताई कोतुळकर, पुष्पा घोजगे, संगीता घोजगे, रा.काँ. म. अध्यक्ष राजश्री राऊत, मा. उपसरपंच धनश्री काशिद, अंकिता ढोरे, बेबी बैकर, रेश्मा शिंदे यांसह सा.का. विष्णु खांदवे, मनोहर काशिद, जयंत राऊत, भाजपा इंदोरी शहराध्यक्ष मनोहर पानसरे, मा. उपसरपंच संदीप नाटक, दिपक राऊत, भरत नाना घोजगे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, प्रकाश घोजगे, मा. सरपंच रमेश घोजगे, मा. सरपंच मधुकर आप्पा ढोरे, सा.का. नामदेव पानसरे, अशोक शिंदे तसेच समस्त ग्रामस्थ व प्रशांतदादा भागवत युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या निमित्ताने थॅलसिमिया आणि ऍनिमिया या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. अशा रुग्णांना महिन्याला लागणारे रक्त सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत व प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. परिसरात असे रुग्ण असल्यास त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ते सहकार्य मिळू शकते, असेही आवाहन करण्यात आले.
समाजहिताचा संदेश देत आणि मानवतेची ज्योत प्रज्वलित करणारे हे रक्तदान शिबिर ग्रामस्थांच्या सहभागामुळे अत्यंत प्रभावी आणि यशस्वी ठरले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
