Dainik Maval News : सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक दिवंगत राज बलशेटवार यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका आणि पुणे – पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कामशेत येथे हे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर शिबिरात एकूण 105 जणांचा रक्त तपासणी करण्यात आली. ज्यात महिलांचाही समावेश होता. तर एकूण 71 दात्यांनी रक्तदान केले. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ या उक्तीप्रमाणे शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र सोबत ब्लड रिपोर्ट देण्यात आला. यासह भविष्यामध्ये रक्तदात्याला किंवा त्याच्या कुटुंबीयाला रक्ताची गरज भासल्यास रक्त मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे – पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले. ( Blood donation from 71 people in Kamshet Camp initiative of Sahyadri Pratishtan )
अधिक वाचा –
– तळेगावच्या मेधा सोनावणे यांना इंग्लंडमधील यूनिवर्सिटी ऑफ रीडिंग मधून ‘पीएचडी’
– पवना धरणात बुडून 28 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू
– मावळ तालुक्यात ७० टक्के भात लागवडी पूर्ण, पवन मावळ विभागात सर्वाधिक लावणी