Dainik Maval News : लोणावळा जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टायगर पॉइंटच्या दरीत एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी (दि. १) आढळून आला. श्रेया नरेंद्र पती (रा. सीबीडी बेलापूर, नवी मुंबई) असे या मृत तरुणीचे नाव असून, ती बेपत्ता असल्याची नोंद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती.
लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अथक परिश्रमाने रात्री उशिरा सदर तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया पती ही ३१ जानेवारीच्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंतच्या कालावधीत बेपत्ता होती. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली होती.
शोधकार्य सुरू असतानाच मौजे आतवन गावच्या हद्दीतील टायगर पॉइंटच्या दरीमध्ये एक मृतदेह पोलिसांना आढळून आला. मिसिंग रिपोर्टमधील वर्णन आणि दरीत सापडलेला मृतदेह यात साम्य आढळल्याने पोलिसांनी श्रेयाचा भाऊ पती याला तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचारण केले. मृतदेह पाहिल्यानंतर निशांत यांनी ती आपली बहीण श्रेयाच असल्याचे स्पष्ट केले.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. श्रेयाचा दरीत पडून मृत्यू नेमका कसा झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो

