Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम पिंपरी-चिंचवड परिवहन विभाग तसेच तळेगाव व देहूरोड पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे.
कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल, पिंपरी चिंचवड परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक आशिष गोगावले, कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे, संचालक सुभाष राक्षे, माजी संचालक ज्ञानेश्वर दळवी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका दडस, देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माने, संतोष राठोड, नागनाथ खरात, राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला मावळ, मुळशी, खेड, हवेली तसेच शिरूर या तालुक्यातून ऊस येत असतो. या ऊसाची वाहतूक चाकण- तळेगाव रस्त्याने तसेच पुणे मुंबई रस्त्याने व मुळशी तालुक्यातील काही महत्वाच्या रस्त्याने होत असते. अपघात टाळण्यासाठी असे रिफ्लेक्टर असणे महत्त्वाचे असते आणि म्हणून कारखान्याच्या वतीने हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार