Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता विकास गरड, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्ताराधिकारी निर्मला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिबिर तळेगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यातून शासकीय व खासगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांचे सक्षमीकरण करणे, हे उद्दीष्ट होते.
- पूर्वमाध्यमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास करणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखडा नुसार अपेक्षित क्षमता, कौशल्ये, ज्ञान विकसित होण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे, राज्य अभ्यासक्रम आराखडा – पायाभूत स्तर, राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण याची माहिती करून देणे, हे प्रशिक्षण शिबिराचे ध्येय होते.
त्यानुसार शिक्षकांना विविध नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे तंत्रे, आधुनिक तंत्रज्ञान यांचा अध्ययन-अध्यापनात प्रत्यक्ष वापर, बदलत्या मूल्यमापनाचे विविध दृष्टिकोन, पैलू व मूल्यमापनाची साधने यांची माहिती करून देण्यात आली. प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून सुहास धस, सचिन ढोबळे, सुमिल नळे, जयश्री बोरसे, अनिरुध्द किल्लेदार, वृषाली कासार, रूपाली बोदले, आनंदा लौढे, यशवंत काळे, नुतन कांबळे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे संयोजन विस्ताराधिकारी निर्मला काळे, केंद्रप्रमुख सुनिल साबळे यांनी केले. प्रास्ताविक शंकर धावणे, सूत्रसंचालन दिलीप पोटे यांनी केले. आभार काकासाहेब भोरे यांनी मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी गंगाराम केदार, शिवाजी जरग, पोपटराव चौगुले, राम कदमबांडे, देवराम परिठे, राजेश गायकवाड, विठ्ठल माळशिकरे, बापू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री