जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथून निगडीकडे येणाऱ्या मार्गावर जकात नाक्याजवळ एका टेम्पोने कारला धडक दिली. 23 मे रोजी हा अपघात घडला होता. या अपघातात कारसह टेम्पो संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली पडले होते. या भीषण अपघातात कार चालकाला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत, तर कारमधील प्रवाशाला एक पाय गमवावा लागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार चालक ज्ञानेश्वर नारायण पाटील (वय 35, रा. वडगाव मावळ, पुणे. मूळ रा. टिटवी, ता. पारोळा, जि. जळगाव) यांचे दोन्ही पाय आणि कार मधील प्रवासी ओमकार प्रकाश जोशी (वय 29) यांचा डावा पाय कापण्यात आला आहे. याप्रकरणी नारायण शामराव पाटील (वय 65) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ज्ञानेश्वर पाटील हे प्रवासी कार चालवत होते. ते 23 मे रोजी सकाळी प्रवासी घेऊन निगडीच्या दिशेने जात होते. जकात नाक्याजवळ आल्यानंतर त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने (एमएच 14/टीसी 179) जोरात धडक दिली. यामध्ये कार रस्त्याच्या बाजूला असलेला लोखंडी संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडली. तसेच टेम्पो देखील खड्ड्यात पडला.
अपघातात कार चालक ज्ञानेश्वर, कार मधील प्रवासी आणि टेम्पो चालक असे तिघे जखमी झाले. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ज्ञानेश्वर यांचे दोन्ही तर प्रवासी ओमकार जोशी यांचा डावा पाय कापावा लागला. दोन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत. ( car and tempo accident near dehu road on old pune mumbai highway car driver passenger legs were cut off )
अधिक वाचा –
– तळेगावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेचा 100 टक्के निकाल; 19 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण । SSC Result 2024
– मोठी बातमी ! दहावीचा निकाल जाहीर, संपूर्ण राज्याचा निकाल 95.81 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, वाचा निकालाची ठळक वैशिष्ट्ये
– पार्क केलेल्या कारची काच फोडून गाडीतील लॅपटॉप, फोन आणि रोकड केली लंपास, तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल