मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी (31 ऑक्टोबर) किलोमीटर 18च्या दरम्यान भीषण अपघात घडला. पुणे लेनवर शोल्डरवर उभ्या असलेल्या एका ट्रकला भरधाव कारची धडक बसली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाल्याने जागेवरच मृत पावली, तर अन्य तीन जण जखमी आहेत, ज्यातील 2 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. ( Car Truck Accident On Mumbai Pune Expressway One Dead )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर घटनेची माहिती मिळताच बचाव दल आणि पोलिस, मदत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. कारमधील मृत महिला आणि इतर जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. कार क्रमांक MH 12 DE 760 हिची ट्रक क्रमांक MH 12 TV 7334 ला धडक बसल्याने हा अपघात घडला.
अधिक वाचा –
– धक्कादायक ! गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, पुल तुटल्याने शेकडो लोक नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
– Video : मावळ तालुक्यात भात कापणीला वेग, शेतकऱ्यांकडून यंत्राद्वारे भात कापणीस प्राधान्य