Dainik Maval News : प्रतिष्ठित कंपनीच्या नावाने बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.15 डिसेंबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास देहूरोड येथील डायमंड वॉच नावाच्या दुकानामध्ये करण्यात आली.
गौरव शामनारायण तिवारी (वय 38, रा. नवी दिल्ली) यांनी रविवारी (दि. १५) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुकानदार विनोद लीलाचंद जैन (वय 58, रा. देहूरोड), दुकानातील कामगार काशिनाथ उर्फ बापू प्रभाकर चव्हाण (वय 26, रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव तिवारी हे फास्टट्रॅक कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेले घड्याळाचे लोगो लावून देहूरोड येथे बनावट घड्याळांची विक्री होत असल्याची माहिती तिवारी यांना मिळाली. त्यानुसार तिवारी यांनी देहूरोड पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी रविवारी कारवाई करत 4 लाख 2 हजार 200 रुपये किमतीचे फास्टट्रॅक कंपनीची बनावट 400 घड्याळे आणि इतर बनावट वस्तू जप्त केल्या आहेत. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी
– जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन । Zakir Hussain Passes Away
– वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज
– महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस