शिरगाव परंदवडी पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर एक टेम्पोतून बेकायदेशीररित्या पाळीव जनावरांचे तब्बल 5 टन मांस वाहतूक करताना पोलिसांनी टेम्पो पकडला आहे.
अजित अरविंद शिंदे (वय 30 वर्षे, व्या. चिंचवड शहर – पोलीस कॉन्स्टेबल, नेमणूक शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन) यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 429 आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियम कलम 6. 9 (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ( Case Registered By Shirgaon Parandavadi Police Against Person Who Transporting Illegal Meat Transporter Tempo Seized )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास पुणे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे रोडवर उर्से टोलनाका पोलीस चौकी जवळ (ता मावळ जि पुणे) पोलिसांनी ही कारवाई केली. यात आरोपी मेहबूब शमसुद्दीन मेंदरगिकर (वय 45, रा. वळसंग, ता. अक्कलकोट जिल्हा सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद तारिख, वेळी आणि ठिकाणी आयसर कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम.एच. 03 सी.व्ही. 9163) यामध्ये आरोपीने टेम्पो मध्ये एकून 5 टन माल किंमत 12,00,000 रुपये ( बारा लाख ) रुपयाचा माल हा म्हैस वर्गीय कत्तल केलेले मांस कत्तल करण्याचा परवाना आणि पशु वैदकीय प्रमाणपत्र नसतांना बेकायदेशीर विनापरवाना वाहतूक करताना आढळून आला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. पोसई गावित हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– शिरगाव इथे पवना नदीकाठी बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
– PHOTO । वडगावमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा; नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित शोभायात्रेत हजारो नागरिक सामील