पवनानगर जवळील तिकोना पेठ येथे गुरुवारी (दि. 14) एका विहिरीत पडलेल्या घोणस जातीच्या विषारी सापाला वन्यजीव रक्षक संस्थेच्या सर्पमित्रांककडून जीवदान देण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तिकोना पेठ येथील विहिरीत साप असल्याचा फोन ग्रामस्थांनी अगोदर वन्यजीव रक्षकचे सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना केला. मांडेकर यांनी याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली. गराडे यांनी याबाबत पवनानगर भागातील संस्थेचे सदस्य तथा सर्पमित्र असलेले रमेश कुंभार यांना माहिती दिली. रमेश कुंभार हे शत्रुघ्न रासनकर आणि संतोष दहीभाते यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. ( Caught snake lying in well at tikona peth village near pavana nagar maval )
माहिती घेतली असता दोन ते तीन दिवसापासून सदर घोणस साप विहिरीत पडलेला असल्याचे समजले. बराच वेळ प्रयत्न करुनही साप बाहेर येत नव्हता. अंधार होऊ लागल्याने अखेर रमेश कुंभार यांनी जोखीम घेऊन खोल विहिरीत पाण्यात उतरून घोणस साप सुरक्षितरित्या पकडला आणि त्या सर्पाला जीवदान दिले.
अधिक वाचा –
– मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप । Maval News
– इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाने घेतला वेग, आंदर मावळातील पर्यटनाला मिळणार चालना । Maval Taluka News
– ‘श्रीरंग बारणे हे दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील’ – मंत्री उदय सामंत । Maval Lok Sabha Election 2024