Dainik Maval News : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो. त्या अंतर्गत काले कॉलनी बीट मधील वारू केंद्राच्या स्पर्धा मळवंडी ठुले या ठिकाणी उत्साहात पार पडल्या. यामध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी, धावणे, उंच उडी, लांब उडी हे मैदानी खेळ, प्रश्नमंजुषा, बुद्धीबळ, वक्तृत्व या बौद्धिक तर बडबड गीत, वेषभूषा, कवितागायन, लोकनृत्य या सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश होता.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रप्रमुख सुनंदा दहितूले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव राजेश राऊत, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक नितीन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन वाघमारे यांनी केले, तर आभार नवनाथ आडकर यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे ;
खो-खो मुली -मोठा गट प्रथम- मळवंडी ठुले,द्वितीय- कोथूर्णे, तृतीय- वारू
लहान गट-प्रथम-मळवंडी ठुले,द्वितीय -कोथूर्णे
मुले-लहान गट प्रथम-कोथूर्णे, द्वितीय -मळवंडी ठुले,तृतीय-वारू
मोठा गट-प्रथम-कोथूर्णे, द्वितीय -मळवंडी ठुले,तृतीय-वारू
कबड्डी-
मुली मोठा गट
प्रथम-मळवंडी ठुले,द्वितीय-कोथूर्णे
मुले मोठा गट
प्रथम-कोथूर्णे, द्वितीय-वारू
गोळा फेक
प्रथम -राजवर्धन दळवी
द्वितीय-सार्थक ठुले
थाळी फेक
प्रथम -राजवर्धन दळवी
द्वितीय-सार्थक ठुले
बुद्धिबळ
प्रथम-यश बेनगुडे
द्वितीय- राजवर्धन दळवी
वक्तृत्व
लहान गट
प्रथम-तीकोणापेठ ,द्वितीय-वारू, तृतीय-कोथूर्णे
मोठा गट-
प्रथम-मळवंडी ठुले,द्वितीय-कोथूर्णे, तृतीय-वारू
लोकनृत्य
लहान गट
प्रथम-कोथूर्णे, द्वितीय-वारू, तृतीय-ब्राह्मनोली
मोठा गट
प्रथम-वारू, द्वितीय-कोथूर्णे
प्रश्नमंजुषा-
लहान गट प्रथम-मळवंडी ठुले,द्वितीय-तीकोणापेठ,तृतीय-कोथूर्णे
मोठा गट प्रथम-मळवंडी ठुले,द्वितीय-कोथूर्णे, तृतीय-वारू.
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024-25- अंतर्गत पंचायत समिती मावळ यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा महागाव येथे घेण्यात आल्या. या केंद्रस्तरीय वेशभूषा स्पर्धेमध्ये धीरज हरीश कालेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने प्लॅस्टिकच्या भस्मासुर ही भूमिका सादर केली त्याला सतीश रुपनवर , वर्षा गायकवाड व शाळेचे मुख्याध्यापिका शर्मिला राजमाने यांचे मार्गदर्शन लाभले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime
– मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News
– जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव