Dainik Maval News : चांदखेड पंचायत समिती गणात आज (दि.२) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा रक्षा कलश आणण्यात आला होता. साळुंब्रे गावात रक्षा कलशाचे पूजन करीत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून ही रक्षा कलश दर्शन यात्रा चांदखेड गणातील अन्य गावांमध्ये सुरू झाली.
साळुंब्रे सहीत गोडुंब्रे, दारुंब्रे, कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे, आढले बुद्रुक, आढले खुर्द, चांदखेड या गावांत ही रक्षा कलश दर्शन यात्रा पोहचली. उद्या (दि.३) रोजी चांदखेड गणातील उर्वरित गावांत ही रक्षा कलश यात्रा जाणार आहे., अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रसेच्या चांदखेड गणातील उमेदवार सुनिता मनोज येवले यांनी दिली.
चांदखेड गणातील ज्या नागरिकांना आपल्या या लाडक्या नेत्याच्या अंत्यविधीसाठी बारामती येथे जाता आले नाही, त्या सर्व नागरिकांना ह्या रक्षा कलशाच्या माध्यमातून अजितदादांचे अंतिम दर्शन होत होते. रथातील अजितदादांच्या प्रतिमेला व कलशाला पुष्प अर्पण करत नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहत होते. श्रद्धांजली वाहत असताना नागरिकांच्या विशेषतः महिला भगिनींच्या भावना अनावर होत होत्या.
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून प्रत्येक गावामध्ये निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली, तर काही कामे सुरू आहेत, या सर्व बाबींना रक्षा कलश दर्शन यात्रेच्या निमित्ताने उपस्थितांकडून उजाळा देण्यात आला.
चांदखेड पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता मनोज येवले या उमेदवार आहेत. स्व. अजितदादा यांचे स्वप्न असलेला विकसित मावळ घडविण्याचा निर्धार आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे. आमदार सुनील शेळके यांचे हे ध्येय साध्य करण्यासाठी स्व. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनिता मनोज येवले यांच्या घड्याळ चिन्हाला मतदान करणे, हीच स्व. अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, असे मत उपस्थित अनेक मतदार बंधुभगिनींनी बोलताना व्यक्त केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
