Dainik Maval News : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या स्मारक ठिकाणी बुधवारी ( दि. १२ ) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भेट दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक येण्याने लोहगडवासियांना अत्यानंद झाला. ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांसाठी बुधवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खासगी दौऱ्यातील काही क्षण काढून लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी येत ग्रामस्थांना भेट दिली. याप्रसंगी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोहगड परिसराचा इतिहास, पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व आणि स्थानिकांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी लोहगड-विसापूर विकास मंचाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांना मंचाच्या उपक्रमांची आणि स्थानिकांच्या विकासाच्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.
मंचाच्या कार्यकर्त्यांसाठी ही भेट एक सुवर्णक्षण ठरली असून, भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ दिल्यास लोहगड पायथ्याशी भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या अचानक भेटीने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लोहगड परिसरात विकासाच्या नव्या शक्यता खुल्या होतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Warkari Accident
