Dainik Maval News : चिखलसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी लहु रामचंद्र चोपडे व व्हाइस चेअरमनपदी सुमन लक्ष्मण वावरे यांची निवड करण्यात आली. वडगाव मावळ येथील सहकारी निबंधक कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी कामकाज पाहिले.
चिखलसे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक भाऊ बारकू लालगुडे, तुकाराम महादु काजळे, सुदाम धनाजी बुरकुले, बबन भीमा काजळे, प्रल्हाद शांताराम काजळे, नारायण शिवराम काजळे, श्रीराम दामू चोपडे, अगन मारुती वावरे, हिरामण राघू साळवे, शंकर कोंडीबा चौधरी, मीनाबाई शांताराम काजळे व धर्माजी नामदेव ठोंबरे (गट सचिव), प्रशांत प्रभाकर ढोरे (साहाय्यक सचिव) यावेळी उपस्थित होते.
चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. चिखलसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र हे चार गावांचे मिळून आहे. चिखलसे सोसायटीत चिखलसे, नायगाव, आहिरवडे, येवलेवाडी या गावांचा समावेश होतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम