Dainik Maval News : जिल्हा महिला व बालविकास विभाग, पंचायत समिती मावळ, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन, पुणे आणि Gestamp Automotive India Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बालदिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
बालदिनानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या आवडीचे नवनवीन खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहानगाव, वडेश्वर, खांडी, कशाळ आणि माळेगाव या शाळांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच खाऊचेही वितरण करण्यात आले. प्रथमच इतक्या सुंदर पद्धतीने आमच्या शाळांमध्ये बालदिन साजरा झाला, असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संस्थापिका डॉ. केरोलीन आणि मुख्य संचालनाधिकारी शकील शेख यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्यवस्थापक वैशाली पवार, प्रकल्प समन्वयक ऋषिकेश डिंबळे, अश्विनी हेंद्रे आणि रणजित शिंदे यांनी केले.
शाळांचे मुख्याध्यापक रघुनाथ मोरमारे, शिंदे सर आणि मोरे सर यांनी आयोजक संस्थेचे व उपस्थितांचे आभार मानले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
