Dainik Maval News : खोपोली शहरात गणेश उत्सवाच्या वातावरणात सर्वजण व्यस्त असताना शास्त्रीनगर मधील इतराज कुटुंबाने नेहरू गार्डनमधे श्री गणेश मूर्तीचे कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन केले आणि जमा झालेले निर्माल्य तेथील कलशात समर्पित केले.
विसर्जनानंतर ते कुटुंबीय शास्त्रीनगर येथील आपल्या घरी गेले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी आवडीने श्री गणेशाच्या गळ्यात घातलेली साधारणता 20 ग्रॅम वजनाची सोनसाखळी निर्माल्यासोबत निर्माल्य कलशात समर्पित केली गेली. त्यानंतर त्यांनी तातडीने विसर्जन स्थळी जाऊन तेथे उपस्थित असलेल्या खोपोली नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे मुकादम मंगेश चंदर वाणी यांना ही बाब सांगितली.
त्यांनी सफाई कर्मचारी सुनील धाकू गायकवाड यांच्याकरवी निर्माल्य कलशातल्या पिशव्यांची तपासणी करून त्यात भूल चुकीने हारासोबत गेलेली सोन साखळी शोधून इतराज कुटुंबाच्या हवाली केल तेंव्हा भक्तीभावाने पूजाअर्चा केल्यानेच आपल्याला श्री गणेशाने असा कृपाशीर्वाद दिल्याची भावना इतराज यांनी बोलून दाखवली.
खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, उपमुख्याधिकारी रणजीत पवार यांनी नगरपालिकेच्या सभागृहात संबंधित प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि पोलीस उप निरीक्षक पूजा चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाबाबत पीएमआरडीए कार्यालयात विशेष आढावा बैठक संपन्न
– मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार । Maratha Reservation
– आनंदाची बातमी ! ‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू ; सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची संधी