Dainik Maval News : जिल्हा परिषद इंदोरी–वराळे गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांनी स्वर्गवासी आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन आपल्या गावभेट दौऱ्याची सुरुवात केली. इंदोरी परिसरातील कुंडमळा, स्वामी समर्थ नगर, ढोरे वस्ती, कॅडबरी कंपनीसमोरील भाग, अल्फानगर आणि पानसरे वस्ती अशा विविध ठिकाणी भेट देत त्यांनी नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
या दौऱ्यात विशेषतः महिलांकडून त्यांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षवेधी ठरला. मेघाताई भागवत यांनी गेल्या काही वर्षांत समाजाभिमुख कामांवर दिलेला भर, तळागाळातील नागरिकांशी ठेवलेला सलोखा आणि विकासासाठी असलेली त्यांची कटिबद्धता यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मकतेची लाट आहे.
“काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे!” या भावना अनेकांनी व्यक्त करत मेघाताईंना उमेदवारी मिळावी, अशी स्पष्ट इच्छा नागरिकांनी दर्शवली. त्यांचे संयमी नेतृत्व, महिलांसाठी सातत्याने केलेले प्रयत्न आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका पाहता त्यांना या गटामधून भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
मेघाताई भागवत यांचे कार्य आणि लोकांशी असणारा संवाद यामुळे त्या इंदोरी–वराळे गटात उदयास येणाऱ्या प्रभावी आणि विश्वासार्ह नेतृत्वापैकी एक म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
