Dainik Maval News : कार्ला लेणी परिसरात पॉलिप्लॅस्टिक्स मार्केटिंग इंडिया प्रा.लि. यांच्या सहकार्याने व शिव विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी स्थानिक शासकीय अधिकारी सागर धानगुडे व टिम यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या स्वच्छता अभियानासाठी संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर व संतोष वंजारी यांनी पुढाकार घेतला होता.
महापरिनिर्वाण दिवसानिमित कामशेत समाज विकास केंद्रात मुले, युवक, महिला यांनी एकत्रित येऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी बचतगट लिडर्स राजश्री गायकवाड व सोनाली जाधव यांनी घेतली होती.
तसेच या सप्ताहात संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले बालपंचायत समिती सदस्य मुलांबरोबर पर्यावरण संरक्षण, परसबाग भेट, परसबाग उभारणी, सेंद्रिय फळभाज्या, पालेभाज्या संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली असे सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था प्रमुख माया वंजारी यांनी नमूद केले.
एकी महिला अधिकार संगठन प्रमुखांबरोबर विविध नेतृत्व विकास, महिला शासकीय योजना याबाबत मार्गदर्शनही या सप्ताहात करण्यात आले असे एकी महिला अधिकार संगठन अध्यक्ष रेश्मा गायकवाड यांनी सांगितले.
ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजिवीका, महिला सक्षमीकरण व महिला शेतकरी सबलीकरण यासाठी संस्था कार्यरत आहे. संस्था विकास व कार्यकर्ता क्षमता बांधणी म्हणून आपण संस्था कार्यकर्त्यांसाठी किसान प्रदर्शन मोशी येथे भेट व सहभाग घेतला असे संस्था प्रमुख संतोष वंजारी यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद टाकवे बुद्रुक शाळेचे वर्चस्व । Maval News
– मळवंडी ठुले येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न, पाहा संपूर्ण निकाल
– वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 108 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी