Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी व लाखो लाडक्या बहिणींना दिलासा देणारी अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असुनही लाभाची रक्कम मिळविलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे घेतले जाणार किंवा त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः महत्वाचा खुलासा केला आहे. याबाबत त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ( CM Majhi Ladki Bahin Yojana )
काय म्हटल्या आहेत मंत्री आदिती तटकरे?
आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया हॅन्डलवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही ! या मथळ्याखाली एक पोस्ट केली आहे. त्यात आदिती तटकरे यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ! अशी पोस्ट मंत्री तटकरे यांनी केली आहे. ( Benefits given will not be taken back )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही.
तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 7, 2025
लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थ्यांना वगळले ( Minister Aditi Tatkare )
दरम्यान या पोस्ट पूर्वीच एक पोस्ट करून आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना धक्काही दिलेला आहे. आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 7, 2025
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर