व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरविले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 17, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरविले होते. यानंतर राज्य सरकारने या योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे सामाजिक परीक्षण करतानाच अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या तसेच प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबांचे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे, अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच दरवर्षी जूनमध्ये लाभार्थी महिलांना ई-केवायसी करावी लागणार आहे.

दरवर्षी ई-केवायसी
नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई- केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभ दिला जाणार.

प्राप्तिकर विभागाची घेतली जाणार मदत
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर फेरतपासणी
अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाकड्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. तर अजूनही 11 लाख अर्जांची छाननी प्रलंबित असून 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त


Previous Post

नाणे येथील घरफोडीत साठ हजारांचा ऐवज लंपास । Maval Crime

Next Post

‘बिल्डरांनी काम न केल्यास पाठीशी घालणार नाही, गरज पडल्यास पीएमआरडीए कार्यालय बंद पाडू’ ; आमदार शेळके यांची कठोर भूमिका

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
International Cooperation Year cooperative housing societies representative meeting at Maval taluka

'बिल्डरांनी काम न केल्यास पाठीशी घालणार नाही, गरज पडल्यास पीएमआरडीए कार्यालय बंद पाडू' ; आमदार शेळके यांची कठोर भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
Water supply scheme worth Rs 39 crore inaugurated at Vadgaon Maval initiative of MLA Sunil Shelke

वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा

March 28, 2026
Stormy wind and rain image

राज्यात दिनांक ३० आणि ३१ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.