तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन तलाव येथे पोहण्यासाठी उतरलेल्या एका 18 वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिकेत घनश्याम तिवारी (वय 18, मु. रा. छत्तीसगढ़, स. रा. मंत्रासिटी) असे तलावात बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आंबी येथील डॉ. डीवाय पाटील महाविद्यालयातील तो विद्यार्थी होता. गुरुवारी (दि. 23 मे) दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, कॉलेजचे तीन मुले आणि एक मुलगी असा ग्रुप एकत्रितरित्या तळेगावात खरेदीसाठी आले होते. खरेदीनंतर ते माघारी परत जात असताना स्टेशन तलाव परिसरात फिरायला गेले. तिथे त्यांना बोटीत फिरायचे होते, परंतू बोट क्लब बंद असल्याने ते पाण्यात पोहायला उतरले. तिन्ही मुले पाण्यात पोहण्यासाठी उतरली. त्यातील अनिकेत थोडा आत गेला आणि स्टंट करत होता. तेव्हा त्याचे पाय खाली टेकले नाही आणि तो बुडू लागला. ( college student drowned in a lake in Talegaon Dabhade )
सोबतच्या मुलांनी लगेच आरडाओरडा करून बचावासाठी नागरिकांना बोलावले. पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी बचाव पथकाला पाचारण केले. परंतू तोवर अनिकेतचा बुडून मृत्यू झाला होता. गुरुवारी बुडालेल्या अनिकेतचे शव शोधण्यात वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांना शुक्रवारी यश आले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोनावळा टीमचे निलेश गराडे, अनिल आंद्रे अनिश गराडे गणेग गायकवाड गणेश सोंडेकर गणेश ढोरे अविनाश कार्ले कुंदन भोसले ताहीर मुमीन श्रीसंत भेगडे कुणाल दाभाडे शुभम काकडे, शेखर खोमणे, धीरज शिदे आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद, अग्निशमन दल आणि इतर ग्रामस्थ, तळेगाव पोलीस यांनी या बचाव – शोध कार्यात सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– मतमोजणीची तयारी झाली ! मावळ लोकसभेची ‘इथे’ होणार मतमोजणी, काय आहेत नियम ? वाचा सविस्तर
– मोठी बातमी ! तळेगाव शहराच्या कचरा डेपो परिसरात तरूणाची आत्म’हत्या, झाडाला शर्ट… । Talegaon Dabhade Crime
– बारावी बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष उपक्रम सुरु, जाणून घ्या