Dainik Maval News : मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण करणार्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास देहूरोड येथे घडली.
कार्तिक सुनील कुंभार (वय २३, रा. दत्त मंदिराच्या पाठीमागे, आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी रविवारी (दि. २) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहूल संजय टाक (वय २१, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कार्तिक कुंभार हे शनिवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास आपल्या गाडीवरून चालले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी राहूल टाक याने फिर्यादी यांची गाडी अडविली.
त्यानंतर शिवीगाळ करून आरडा ओरडा करीत हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. तुला आता जिवंत सोडत नाही, अशी धमकी दिली. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक