मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह अवकाळी पावसाचे आगमन होत असून या पावसामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. आज (दि. 14 मे) दुपारी झालेल्या वादळामुळे शिलाटणे गावातील अनेकजणांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच कार्ला गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने एम एस सी बी आॕफिस समोर लावलेल्या अक्षय पवार यांंच्या चारचाकी वाहनावर फांदी पडल्याने नुकसान झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिलाटणे गावाखालील पडाळीवर बाबाजी धोंडिबा भानुसघरे, निवृती कोंडिराम भानुसघरे, शांताराम कोंडिराम भानुसघरे या ग्रामस्थांच्या घरांचे व दुकानाचे पत्रे फुटले व उडून गेल्याने खुप मोठे नुकसान झाले. वादळामुळे गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. तसेच या वादळामुळे विजवाहक तारा तुटल्या व खांबाचे देखील नुकसान झाले. ( Damage to houses due to storm in Maval taluka )
त्यामुळे काही काळ काही भागात विजपूरवठा देखील खंडित झाला होता. परंतु तत्परतेने महावितरण कर्मचा-यांनी तो विजपूरवठा देखील सुरळीत केला. या अचानक आलेल्या वादळामुळे व पावसाने ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याचा पंचनामा करुन नुकसानभरपाई मिळावी, यासाठी नुकसानग्रस्त ग्रामस्थ मागणी करत आहे.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News
– आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा मतदारसंघात 52.90 टक्के तर मावळ विधानसभेत 53.02 टक्के मतदान, ‘या’ ठिकाणी झाले सर्वाधिक मतदान । Maval Lok Sabha