Dainik Maval News : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या दत्त मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा केंद्र यांच्या वतीने मंदिरात गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरु होता. या सप्ताहात तीनशेहून अधिक सेवेकरी सहभागी झाले होते.
श्री दत्त जयंती निमित्त देवस्थान संस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते महाअभिषेक संपन्न झाला. त्यानंतर काकडा आरती, भजनी मंडळ यांचा सामुदायिक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. संध्याकाळी पाच ते सात कीर्तन झाले. हभप गहिनीनाथ महाराज खेडकर (बीड) यांची दत्त जन्मावरील कीर्तनसेवा संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
एकूण आठ दिवस सुरु असलेल्या या कार्यक्रमाने वडगाव मावळ शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान चे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, इतर सर्व विश्वस्त व स्वामी सेवा केंद्र प्रमुख गणेश लष्करी, सर्व सेवेकरी आणि वडगाव ग्रामस्थांनी केले होते.
दत्त जयंतीच्या मुहूर्तावर माजी पंचायत सभापती सभापती गुलाबराव गोविंदराव म्हाळसकर यांनी परिवाराच्या वतीने श्री दत्त महाराज यांच्या चरणी चांदीची छत्री अर्पण केली. महाप्रसादाचे नियोजन उद्योजक दत्तात्रय कुडे यांच्या परिवाराने केले होते. नव्याने बांधण्यात आलेल्या श्री दत्त मंदिरात दत्त भगवंत यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड प्रकल्पाचे अद्यापही 200 हेक्टर भूसंपादन बाकी, ‘या’ जमीन मालकांना मिळणार 25 टक्के भरपाई । Pune Ring Road
– दोन्ही राष्ट्रवादी एकत्र… आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने खळबळ, राज्यभर होतीये चर्चा । MLA Sunil Shelke
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी