व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनाथांचा नाथ…! शिरीष महाराज मोरे यांची शेवटची इच्छा केली पूर्ण, कर्जाचा डोंगर उतरवला । DCM Eknath Shinde – Shirish Maharaj More Family

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 9, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
DCM Eknath Shinde Financial help to family of late Shirish Maharaj More

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज (दि.9) आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत होते. आताही उपमुख्यमंत्री म्हणून डेडीकेटेड टू कॉमन मॅन प्रमाणे काम करीत आहेत. अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे तत्परतेने धावून जातात, याचा प्रत्यय आता पुन्हा आला आहे.

  • जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदाय नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. आर्थिक अडचणीतून शिरीष मोरे यांनी आपले आयुष्य संपवले. ही बाब एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी मोरे कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज (दिनांक 9 फेब्रुवारी) एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी हा निर्णय घेतला असून शिंदेच्या बाबतीत बोलले जाणारे अनाथांचा नाथ ही ब्रीद त्यांनी खरे करून दाखविले आहे. आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे. ( DCM Eknath Shinde Financial help to family of late Shirish Maharaj More )

चार चिठ्ठ्यांमध्ये सापडलं कारण
‘माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे. पैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या.’ अशी विनंती शिरीष महाराजांनी मित्रांना केली होती. तर, ‘मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली ; आता वडगाव शहरातच होणार उपविभागीय कार्यालयातील सुनावणी

Next Post

श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यान रेल्वे सुरू होणार ? खासदारांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन । Dehu to Pandharpur Railway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Dhairyasheel Mohite Patil Demand to Railway Minister Ashwini Vaishnav to start Dehu to Pandharpur Railway

श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यान रेल्वे सुरू होणार ? खासदारांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन । Dehu to Pandharpur Railway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.