Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद व तीन नगरपंचायती यांची सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरिता ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात होती, या प्रारुप यादीच्या अनुषंगाने १३ ऑक्टोबर १०२५ पर्यंत सूचना व हरकती स्वीकारण्यात येणार होत्या.
तथापि राज्य निवडणूक आयोगाने सूचना व हरकती स्वीकारण्याची मुदत १७ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी आपल्या सूचना व व हरकती सादर करण्याचे आवाहन नगरपालिका शाखेचे प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.
नागरिकांनी प्राप्त झालेल्या सूचना व हरकती यांचा विचार करुन ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांच्या सूचना व हरकती संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यंकटेश दुर्वास यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी