मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक संतोष कडू यांच्या मातोश्री पार्वतीबाई किसनराव कडू यांचे मंगळवारी रात्री उशीरा दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज (बुधवार, 4 जानेवारी) रोजी वाघेश्वर येथे (मुळ गावी) अंत्यसंस्कार होणार आहे. ( Death News Parvatibai Kadu Passes Away Wagheshwar Maval Taluka )
मागील अनेक दिवसांपासून पार्वतीबाई या आजारपणाशी झुंज देत होत्या. अखेर मंगळवारी (2 जानेवारी) रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय 83 होते. आज सकाळी 10 वाजता त्यांचा वाघेश्वर येथे अंत्यविधी होईल, अशी माहिती संतोष कडू यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कै पार्वतीबाई किसनराव कडू यांच्या मागे त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांचे पती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव कोंडीबा कडू यांसह त्यांची दोन मुलगे संभाजी कडू (उद्योजक), संतोष कडू (उद्योजक), दोन मुली नंदा ज्ञानदेव साठे आणि सुनिता भगवान लगड आणि नातवंडे असा संपूर्ण परिवार शोकमग्न झाला आहे.
अधिक वाचा –
– सावधान! पाणी भरुन ठेवा.. मोबाईल चार्जिंग करा… राज्यातील वीज कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर
– कर्तृत्ववान नेता काळाच्या पडद्याआड गेला; आमदार लक्ष्मण जगताप यांना खासदार श्रीरंग बारणेंकडून श्रद्धांजली अर्पण