राज्यातील विविध नागरी सहकारी बँकांचे शाखाअधिकारी आणि वसूली अधिकारी यांचे तीन दिवसीय कर्ज वसुली प्रशिक्षण शिबिर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे पार पडले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्यावतीने तळेगावात बँक अधिकाऱ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या तीन दिवसीय शिबिरात दिलेल्या कर्जाची वसुली कशी करावी, यासंदर्भात शिबिरार्थींना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल कारंजकर, उपाध्यक्ष ॲड. साहेबराव टकले आदी उपस्थित होते. कोकण, मुंबई, मराठवाडा या संपूर्ण परिसरातून शिबिराच्या निमित्ताने अधिकारी वर्ग एकत्रित आला होता. सुनील चांदेरे यांनी यावेळी उपस्थित शिबिरार्थींशी संवाद साधता आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याषी संपर्क साधून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. (Debt Recovery Training Camp for Civil Co-operative Bank Officers at Talegaon Dabhade)
अधिक वाचा –
– धक्कादायक! मृत झालेल्या बिबट्याच्या पायाचा पंजा आणि नखे कापून नेली, अवयव चोरीप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल । Pune News
– गाव चलो अभियान अंतर्गत तुंगार्ली येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा दौरा, ‘विकसित भारत घडवण्यासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करा’ – विक्रांत पाटील
– बंद म्हणजे बंद..! ‘शिरे-शेटेवाडी येथील दगड खाण आणि अवैध स्टोन क्रशर कायमस्वरुपी बंद करा, नाहीतर..’ ग्रामसभेत ठराव