पावसाळा तोंडावर आला असला तरीही सध्या पवना धरण जलाशयात असणारा पाणीसाठा पाहता परिसरातील नागरिकांनी आणि पिपंरी-चिंचवड शहरवासियांनी पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. याचे कारण मे महिन्याचा शेवटचा आठवडा सध्या सुरु असून आता पवना धरणात अवघा 26.35 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा जल साठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका असला तरीही पावसाने दडी मारल्यास भविष्यात पाणीकपातीचे संकट ओढावू शकते, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपूनच वापरावे, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. ( decrease in pavana dam water storage )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवना धरणात रविवारपर्यंत (दिनांक 28 मे) एकूण 26.35 टक्के पाणी साठा होता. सध्या उन्हाचा तडाका वाढल्याने बाष्पीभवनाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे. कडक उन्हामुळे पवना धरणात सध्या 26.35 टक्के इतका पाणी साठा उरला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी या काळात 26.82 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे वेगाने पाणीसाठा घटत असल्याने हा सावधानतेचा इशारा सर्व नागरिकांसाठी आहे. याचे कारण जर पावसाने ओढ दिली तर धरणावर अवलंबून असेल्या पवनमावळ परिसरात आणि पिंपरी-चिंचवड शहरात पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
अधिक वाचा –
– शिरगाव – सोमाटणे फाटा मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात, महिलेचा मृत्यू, धडक झाल्यानंतर कारचालक फरार
– बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार