Dainik Maval News : कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटामधील कामशेत, कान्हे, नायगाव, चिखलसे, आहिरवडे या सर्व भागातील नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीच्या उमेदवार व पीएमआरडीए च्या सदस्या दिपाली दीपक हुलावळे मोठा प्रतिसाद मिळत असून मावळ तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी व कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटातील समस्या सोडवण्यासाठी या भागातील ग्रामस्थांनी दिपाली हुलावळे यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या रक्षा कलश यात्रेच्या निमित्त या सर्व भागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली दीपक हुलावळे व पंचायत समितीचे उमेदवार समीर जाधव यांनी मतदारांची भेट घेतली. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ तालुका घडवण्यासाठी आपले एक मत विकासाला मिळावे अशी भावना यानिमित्त त्यांनी व्यक्त केली. मतदारांनी देखील अजितदादा पवार यांच्या आरक्षण कलशाचे दर्शन घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे म्हटले आहे.
कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटामधील कार्ला पंचायत समिती गण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तर खटकाळा गणामध्ये देखील आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. विकासाची दूरदृष्टी असलेले हे उमेदवार निश्चितच या संपूर्ण भागाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करतील असा विश्वास देखील मतदार व्यक्त करत आहेत.
दीपक हुलावळे यांचा देखील या सर्व भागांमध्ये मोठा जनसंपर्क असून कामाच्या माध्यमातून मागील 25 ते 30 वर्ष ते सातत्याने या सर्व नागरिकांच्या संपर्कामध्ये आहेत प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभे राहणारे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. कार्ला या गावाचे सरपंच म्हणून काम करत असताना मावळ तालुक्यामधील एक आदर्श गाव त्यांनी घडवला व आजही त्या गावातील विकास कामांची चर्चा सर्वत्र केली जाते अशीही विकासाची दृष्टी असलेले व्यक्तिमत्व असून त्यांच्या माध्यमातून निश्चितच या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी व विकास कामे होतील असा विश्वास सर्व मतदार व्यक्त करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो