Dainik Maval News : श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठान आयोजित गाथा चिंतन रौप्यमहोत्सव सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी संत वाङ्मयाचे निष्ठावंत अनुवादक प्रा. वेदकुमार वेदालंकार यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे सर व संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यासह “अभंगवारी” कार्यक्रमाचे प्रमुख निर्माते व विश्व वारकरी सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप जिवलग कोहळे व फेसबुक दिंडीचे प्रवर्तक स्वप्निल रामभाऊ मोरे व फेसबुक दिंडी टीम यांस तपोनिधी श्री संत नारायण महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, संत साहित्याचे अभ्यासक व गाथा चिंतनचे निरूपणकार सचिनदादा पवार, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, अभंग अक्षरे फेसबुक पेजचे प्रवर्तक, चित्रकार प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड, संगीत देव बाभळीचे संगीतकार आनंद ओक, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गाडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी देहू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.
गाथा चिंतन हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी याप्रमाणे श्रीक्षेत्र देहू मध्ये अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केला जातो. या गाथा चिंतनातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे साध्या सोप्या भाषेत निरूपण केले जाते. गाथा चिंतन २५ वे सत्र मोठ्या भक्तीमय महोत्सवात ह.भ.प. सचिनदादा पवार यांच्या प्रासादिक वाणीतून संपन्न झाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन