Dainik Maval News : टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) – टाकवे बुद्रुक हे आंदर मावळ मधील 50 गावांचे मुख्य दळणवळणाचे केंद्र आहे. आंदर मावळ मधील नागरिक महत्त्वाच्या कामानिमित्त टाकवे बु. मध्ये नेहमी येत असतात. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, इतर संस्था, सोसायट्या, प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम शाळा, कॉलेज अंगणवाड्या, बँका,ग्रामपंचायत कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, ई सुविधा केंद्र, झेरॉक्स मशीन दुकाने यांसह अशी अनेक महत्त्वाची असणारे ठिकाणे टाकवे बु. येथे आहेत. पूर्ण वेळ वीज नसणे त्यामध्ये कमी दाबाने वीज असणे अशा विजेच्या विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ अभ्यास करता येत नाही. गृहिणींना घरामधील कामात अनेक अडचणी येतात, दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांना हताश होऊन अनेक वेळा माघारी जावे लागत आहे.
दरम्यान टाकवे बुद्रुकमध्ये विजेची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्या अनुषंगाने टाकवे बु.ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आमदार सुनील शेळके व महावितरण यांच्याकडे विजेची समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला होता. परिणामी याची दखल घेत आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून व महावितरण वडगाव मावळ यांच्या माध्यमातून टाकवे बुद्रुक येथे १०० केव्हीचे दोन व फळणे येथे एक असे तीन रोहित्र उपलब्ध झाले आहेत.
दरम्यान हे रोहित्र बसवून तीन महिने होऊन गेले आहेत. मधल्या काळात विधानसभा निवडणुका असल्याचे व आचारसंहितेची करणे सांगून आम्हाला ऑफिसमध्ये कामे आहेत. इलेक्शन ड्युटीला जावं लागत आहे, असे सांगून महावितरण विभाग वडगाव मावळ अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी रोहित्र जोडून देण्यास तीन महिने होऊनही टाळाटाळ केली जात आहे.
येथील नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत की, रोहित्र शोभेसाठी बसवली आहेत का? या भागातील बंगलोवाले धनदांगडे व्यक्ती यांचे रोहित लगेच सुरू होतात, मात्र हि तीन रोहित्र सार्वजनिक असल्यामुळे सुरू करण्यास शासकीय विभागातून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे का? तीन महिने होऊन गेले तरी देखील रोहित्र जोडण्यासाठी अधिकारी व संबंधित ठेकेदार या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येत नाही, याचा अर्थ नागरिकांनी नक्की काय समजायचा, असा येतील जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे?
परिणामी हे रोहित्र जोडले गेल्यास विजेच्या लपंडावाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होईल. येथे विविध कामासाठी येणाऱ्या 50 गावातील नागरिकांचा वेळ वाचेल, येथील नागरिकांच्या विजेअभावी असणाऱ्या अनेक समस्या सुटतील.
वडगाव मावळ महावितरण कनिष्ठ अभियंता राहुल परदेशी, व संबंधित ठेकेदार यांच्याशी याभागातील तीन रोहित्र जोडण्यासाठी संपर्क केला असता. कनिष्ठ अभियंता परदेशी सांगतात ठेकेदार यांच्याशी संपर्क करा, ठेकेदाराशी संपर्क केला असता ते सांगतात इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर येऊन पाहणी करतील त्यानंतर रोहित्र जोडून देतील. अशी गेले तीन महिन्यापासून उडवा उडवायची उत्तरे मिळत आहेत. मग नक्की हे काम कोणाचे ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. – ग्रामपंचायत सदस्य, सोमनाथ असवले
येथील अनेक वर्षंपासून जुने असणारे 200 केव्हीचे रोहित्रवरती त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन आहेत. या रोहित्रावरती प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य, केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम शाळा, कॉलेज अंगणवाड्या,ग्रामपंचायत कार्यालय, जल शुद्धीकरण केंद्र, मंडळ अधिकारी, कार्यालय, तलाठी कार्यालय, पीठ गिरणी काही झेरॉक्स मशीन दुकाने आहेत. यावरीती रोहित्रावरती विजेचा ताण जास्त असल्याने नेहमी फ्युज जळणे,रोहित्र वरून विजेच्या तारेला जोडली गेलेली केबल वारंवार जळणे या समस्या थांबण्यासाठी नवीन बसवलेले रोहित्र तत्काळ जोडले गेले पाहिजेल, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. – टाकवे बुद्रक सामाजिक कार्यकर्ते, राजू शिंदे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News
– रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– घराच्या बांधकामावरून लाकडी दांडक्याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime