आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दिनांक 24 ऑगस्ट 2023) रोजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी भेटीत बेरड समाजाचा महामंडळात समाविष्ट होणे, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना समाजातील संघटनांना विचारात घेऊन नेमणूक करण्यात यावी, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक, मामलेदार कचेरी जतन, संवर्धन व सुशोभीकरण याबाबत चर्चा करण्यात आली. ( Delegation of Adya Krantiveer Raje Umaji Naik Kshatriya Ramvanshi Association Met Chandrakant Patil )
समाजातील मुला-मुलींना खेळ आणि सैनिकी प्रशिक्षण करिता आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ज्यातून समाजातील मुला-मुलींना खेळात विविध स्तरावर कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षण आणि पोलीस, सैनिकी विभागांमध्ये भरती करता संधी उपलब्ध होईल. तसेच या भेटीत समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण आणि इतर पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 47 गावांतील पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर; पाहा आरक्षणासह गावांच्या नावांची संपूर्ण यादी
– शुक्रवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार
– महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया