Dainik Maval News : मार्च महिना मध्यावर असताना उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसत आहे. यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने वातावरणातील उष्मा कमालीचा वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आपसुकच गरमीने हैराण झालेल्या जीवाला थंड पेय मग थंड पाणी, शीतपेय पिण्याची गरज भासू लागते. यामुळे सध्या थंड पेय, शीत पेय यांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
मावळ तालुक्यात जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत थंड पेय विकणारी अनेक दुकाने थाटल्याचे चित्र दिसत आहे. तर, जवळपास सर्वच दुकानात फ्रिजमध्ये कोल्ड्रींग्ज अर्थात शीतपेय विक्रीसाठी ठेवल्याचे दिसत आहे. साधारण दुपारच्या सुमारास जेव्हा उन्हाचा तडाखा सर्वाधिक असतो, तेव्हा थंडाईकडे माणसांची पाऊले अपोआप वळत आहे. माणसांसह वन्य पशू पक्षी, पाळीव प्राणी हेही उष्म्याने हैराण झाल्याचे दिसत आहे.
कुलिंग चार्जेसच्या नावावर अधिक पैसे मागणे चुकीचे
उन्हाळा सुरू झाल्यामुळे थंड पाण्यासह विविध शीतपेयांची मागणी वाढली आहे. परंतु बाटलीबंद पाणी असो किंवा अन्य शीतपेय यांची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली एका बाटलीमागे पाच ते दहा रुपये दुकानदार जास्तीचे घेत आहेत. नियमानुसार कोणतीही पाकीटबंद, बाटलीबंद वस्तू किंवा पदार्थ हा छापील किमतीनुसार विक्री करणे बंधनकारक आहे. परंतु असे असताना उन्हाळ्यात शीतपेयांची विक्री ही छापील किमतीपेक्षा अधिक दराने होत असून कुलिंग चार्जेसच्या नावाखाली है वाढीव पैसे घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मुळात एमआरपी किंमतीत सर्व चार्जेस असतात, त्यामुळे वेगळे चार्जेस देण्याची आवश्यकता नसते.
कुलिंग चार्जेससह शीतपेयाची किंमत ठरविली जाते, त्यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त कुलिंग चार्जेस देऊ नयेत. तसेच पैसे जास्त घेतल्यास तक्रार करता येऊ शकते. छापील किमतीपेक्षा अधिक दराने पदार्थाची विक्री करणे बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीने वाढीव दराने शीतपेयाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध नागरिक ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकतात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग