Dainik Maval News : आषाढी एकादशीनिमित्त रविवारी (दि. ६ जुलै) वडगाव मावळ शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी येथील श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानने केली आहे.
देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे व सचिव अनंता कुडे यांनी याबाबत वडगाव नगरपंचायत व वडगाव मावळ पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. रविवारी आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण असणार आहे.
या दिवशी वारकरी संप्रदायाने गावोगावी भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने या दिवशी वडगाव शहरातील सर्व मांसाहारी दुकाने बंद ठेवावीत. वडगाव नगरपंचायत व पोलीस ठाण्याने तसे आदेश संबंधित दुकानदारांना द्यावेत, अशी मागणी देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार ; नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू
– पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 32 गावांना विकासात्मक न्याय देणार ; राज्य सरकारचे आश्वासन
– विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन । Pune News