Dainik Maval News : देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा बुधवारी (दि.25 डिसेंबर) 70 वा वर्धापन दिन होता. यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाख्खो बौद्ध बांधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी येथील भगवान गौतम बुद्ध आणि अस्थीस्तुपाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. वाहतूक नियंत्रक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात होता.
चैत्यभूमी, धम्मभूमी आणि दीक्षाभूमी असा त्रिवेणी संगम असलेल्या देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या बुद्ध विहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते 25 डिसेंबर 1954 मध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ऐतिहासिक धम्मभूमीत राज्यभरातून आलेले हजारो भीमअ नुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपास मेणबत्त्या प्रज्वलित करून व पुष्प अर्पण करून नतमस्तक झाले.
बुद्धविहार कृती समिती समितीच्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यात विदर्भीय भीम सैनिकांचे स्वागत करून सामुदायिक वंदना घेण्यात आली. संघपाल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली महाधम्म रॅली झाली. पंचशील ध्वजारोहण झाले. सायंकाळी राष्ट्रीय धर्मगुरू भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते धम्मशास्त्री असित गांगुर्डे व प्रबुद्ध साठे यांच्या अध्यक्षतेत महाबुद्ध वंदना घेण्यात आली.
भारतीय महसूल सेवेचे आयुक्त विकास सूर्यवंशी, समाजसेविका अनिता सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक धम्मभूमीचे अनुवर्तक व उद्योजक विठ्ठल कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सायंकाळी धम्मभूमी फेस्टिवल विजेता पुरस्कार वितरण समारंभ व मनोगत सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार