मावळ तालुक्यातील पवनमावळ विभागातील मौजे शिळींब गावात गुरुवारी (दिनांक 26 जानेवारी) देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. गावातील प्राथमिक शाळेत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ध्वजवंदन सोहळ्यानंतर मावळ भागात कार्यरत असणाऱ्या बी एल मानकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे गावातील आदिवासी कुटुंबीयांना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले. ( Distribution Of Free Blankets To Tribal Families Of Shilimb Village By B L Mankar Social Foundation Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या थंडीचा कडाका सुरु आहे, अशात बी एल मानकर सोशल फाउंडेशनकडून शिळींब गावातील आदिवासी बांधवांना मायेची उब मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाला उपस्थित असणारे पाहुणे, मान्यवर आणि बी एल मानकर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
अधिक वाचा –
– शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान
– संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, कांचन भालेराव यांच्या हस्ते ध्वजवंदन । Republic Day 2023
– खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते शाळांना मोफत संगणक वाटप; महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचाही सत्कार