आंदर मावळ : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील वडेश्वर, माऊ येथील 39 कातकरी बांधवांना मोफत जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर रहात असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात जाऊन जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील तीन वर्षांपासून ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांच्या कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेतले. ( Distribution of free caste certificates to 39 tribal peoples through MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक गावात जाऊन मोफत जातीचे दाखले वाटप करण्यात आले. याचा फायदा दोन हजारांहून अधिक कातकरी कुटुंबाना आजपर्यंत झाला आहे. कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध झाल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.
“समाजातील सर्व घटकांसाठी आमदारांनी नेहमीच कुटुंबप्रमुखाप्रमाणे चांगले काम केले आहे.सर्वसामान्यांची खरी गरज ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी कातकरी बांधवांना केलेली ही मदत खरंच कौतुकास्पद आहे.” – छगन लष्करी (माजी चेअरमन)
यावेळी सरपंच छाया हेमाडे, उपसरपंच हेमांगी खांडभोर, सदस्य ज्ञानेश्वर जगताप, शिवराम शिंदे, दत्तात्रय चिमटे, वसुदेव लष्करी, मनीषा दरेकर, रुपाली सुपे, कुंदा मोरमारे, सुरेखा शिंदे, ग्रामसेवक सचिन कासार, रवींद्र हेमाडे, प्रशांत जांभळे, किरण जगताप, सुरज साळुंखे, वसुदेव तनपुरे, बाळू मोरे, सचिन वामन आदि उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी’, तळेगाव शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार
– प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील