Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील सहयोग फाउंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. पवन मावळ विभागातील सोमाटणे येथील श्री तुळजाभवानी विद्यालय, परंदवडी येथील बा.न. राजहंस विद्यालय, दिवड येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि आढले येखील कर्मवीर विद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप पानसरे, सोनबा गोपाळे गुरुजी, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिखारे, कार्याध्यक्ष रमेश आरगडे, प्रवीण हुलावळे, मनोहर खुणे, मुख्याध्यापक शशिकांत जाधव, प्रभारी मुख्याध्यापिका मुल्ला आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थिनींना आरोग्यविषयक माहिती मान्यवरांकडून सांगण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा ; आमदार शेळकेंची अधिकारी व ठेकेदारांना तंबी
– गांजा बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक, गहुंजे हद्दीत पोलिसांची कारवाई, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त । Maval Crime