लोकसभा निवडणूक 2024 हा राष्ट्रीय महोत्सव असून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्ला गावातील मतदारांना घरपोच मतदान ओळखपत्र चिट्टी (व्होटर स्लिप) वाटप करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दिनांक 13 मे रोजी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील 3 मतदारसंघात याच दिवशी मतदान होणार आहे. यंदा लोकसभा निवडणकीत कोणीही मतदार मतदानापासून वंचिक राहू नये, यासाठी निवडणूक आयोगामार्फत अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. ( Distribution of voter sleep to voters at Karla Maval Lok Sabha )
मावळ तहसील अतंर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसिलदार विक्रम देशमुख, नायब तहसिलदार गणेश तळेकर, जयश्री मांडवे, मंडल अधिकारी आशा धायगुडे, तलाठी दिपक धनवडे यांंच्या मार्गदर्शनाखाली बीएलओ यांच्यामार्फत गावागावात वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांना त्यांचे मतदार क्रमांक आणि फोटो असलेले वोटर स्लीपचे वाटप सुरु आहे.
कार्ला येथील बीएलओ उमेश इंगूळकर, विवेक भगत हे कार्ला गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती करत असून मतदान करण्यास प्रवृत्त करुन मतदान अनुक्रमांकाची चिट्टी वाटप करत आहे. विविध पक्ष जसे आपल्या पक्षाच्या वोटर स्लीप वाटतात, तशाच वोटर स्लीप निवडणूक आयोगाद्वारे बीएलओ मतदारांना घरोघरी जाऊन देत आहेत.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश, मावळमधील ‘हा’ बाजार राहणार बंद
– तळेगाव येथे मावळ लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 130 अधिकारी कर्मचाऱ्यांना EVM हाताळणीचे प्रशिक्षण । Maval Lok Sabha
– रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News