Dainik Maval News : भारताचे आयुर्वेद शास्त्र भरपूर प्रगत आहे. आयुर्वेद हे मुख्यतः व्यायाम, मसाज आणि विविध वनस्पतींच्या उपयोगाने माणसाला निरोगी व सुदृढ आयुष्य कसे जगता येईल हे सांगते. याच आयुर्वेदातील वेगवेगळ्या वैज्ञानिक आधार असलेल्या जीवन पद्धती “परंपरा” म्हणून आपल्या भारतात आजही पाळल्या जातात. त्यातीलच एक दिवाळीला केले जाणारे अभ्यंगस्नान. ” अभ्यंगस्नान ह्या शब्द दोन शब्दांना जोडून बनलेला आहे. अभ्यंग म्हणजे तेलाने केलेली मालिश, आणि स्नान म्हणजे अंघोळ.” फक्त परंपरा नसून आपण दररोज अभ्यंगस्नान करणं हा एक अतिशय लाभदायी फिटनेस मंत्र आहे. कसा ते पाहूया.
अभ्यंगस्नान हे आपण वर्षातून एकदाच नरकचतुर्दशीच्या दिवशी करतो. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून, अंगाला तिळाचे तेललावून मालिश करून, औषधी उटण्याने अंघोळ करतो. अभ्यंगस्नान हे नाकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. आणि ते योग्यही आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्याने सगळी मरगळ आणि आळस निघून जी तरतरी येते, जो उत्साह येतो त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण. या अभ्यंगस्नानाचे वैज्ञानिक दृष्ट्या बरेच फायदे आहेत.
१) तणावातून मुक्ती मिळणे – 2011 साली 20 माणसांवर आणि 2018 साली 44 स्त्रियांवर केल्या गेलेल्या संशोधातून असे समोर आले आहे की, अभ्यंगस्नानावेळी सुगंधी तेलाने केल्या गेलेल्या मालिश ने आपला ताण ९०% कमी होतो.
२) हृदय विकारांपासून बचाव – ताणाचा आपल्या चेतासंस्थेवर म्हणजेच नर्व्हस सिस्टम वर अतिशय नकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे हृदय विकार होऊ लागतात. अभ्यंगस्नानावेळी केलेल्या तेलाच्या मालिश ने व वापरल्या जाणाऱ्या सुगंधी उटण्यामुळे ताण कमी होते, व हृदयाच्या नसा आणि रक्तवाहिन्या मोकाळ्याहोऊन रक्ताभिसरण सुरळीत होते. ज्याने हार्ट अटॅक, ब्लॉकेज हे हृदय विकार टाळले जातात.
3) रक्तदाबाचा त्रास नाहीसा होतो – भरपूर वैज्ञानिकांनी अंगाच्या मालिशचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात याच्याविषयी संशोधन केलेले आहे. त्यांच्या संशोधनानुसार अभ्यंगस्नानावेळी केल्या जाणाऱ्या विविध तेलांच्या मालिशने रक्तवाहिन्या रुंदावतात आणि मोकळ्या होतात ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन, हायपरटेन्शन आणि रक्तदाबाचा त्रास नाहीसा होतो.
4) त्वचाचे सौंदर्य खुलणे – दिवाळी हिवाळ्यात येते जेव्हा त्वचा कोरडी होऊन फाटणे, भेगा पडणे हे त्रास सुरू होतात. पण अशावेळी आपण तेलाने मालिश करून ते तेल अंगात मुरु दिल्यास हे त्रास कमी होतात.
अभ्यंगस्नानात सोबतीला उटणं असतंच. ज्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचेला येणारी खाज कमी होते आणि कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा इन्फेक्शन झालेले असेल ते नाहीसे होते. याच बरोबर त्वचेवर सुरकुत्या येणे, डाग येणे आणि उर्वरित म्हातारपणाची लक्षणेही कमी होतात. या अभ्यंगस्नानाचा फायदा द्विगुणित होण्याकरता आपण आपल्या त्वचेच्या प्रकाराला सूट होईल असे तेल वापरू शकता. जसे –
कोरड्या त्वचेकारता – बदाम, तीळ आणि अवोकाडोच्या तेलाचा वापर करावा.
सेन्सेटीव्ह त्वचेकरता – तूप किंवा सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करावा.
तेलकट त्वचेकरता – जवसाचे किंवा सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतील.
5) स्नायू व सांधे मोकळे होतात – अभ्यंगस्नानात डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत संबंध अंगाची तेल लावून मालिश केली जाते. त्या तेलाच्या मालिश ने व उटण्याच्या रवाळ दाण्यांनी आपले अकडलेले स्नायू व सांधे दोन्ही मोकळे होतात. त्यांना तेल मिळून ती सुरळीतपणे आपली कार्ये करू शकतात.
6) हाडं मजबूत होणे – लहान मुलांची नियमित तेलाने मालिश करून अंघोळ घातली जाते. त्यांची हाडं बळकट व्हावी हे त्यामागील कारण होय. पण आपण मोठे झालो कि अपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. पोटातून खाल्लेले कॅल्शियमच आपल्याला पुरेल हा समाज होऊन आपण मालिश करण्याकडे फारसे लक्ष देत नाही. पण ज्यांना हाडं आणि सांधे दुखण्याचा त्रास आहे त्यांनी आपली हाडं मजबूत होण्यासाठी वेग वेगळ्या तेलांनी नियमित मालिश केल्यास त्यांची हाडं मजबूत होतील. नियमित अभ्यंगस्नान केल्याचा हा एक खूप मोठा फायदा आहे. ज्यामुळे मणक्यात गॅप येणे, अवेळी हाडं ठिसूळ होणे, शक्ती जाणे हे त्रास आपल्याला लवकर शिवणार नाहीत.
7) lymphatic system साठी गुणकारी – lymphatic system हि आपल्या शरीरातील सगळ्याच प्रकारची घाण शरीरातुन बाहेर काढण्याची महत्वाची भूमिका बजावत असते. अभ्यंगस्नानावेळी केलेल्या मालिश ने व नंतर अंगावर घेतलेल्या पाण्याने ह्या सिस्टमला भरपूर फायदा होतो. कोणाची शस्त्रक्रिया झाली असेल तर कधी कधी ह्या प्रक्रियेत अडथळा म्हणून पाणी आपल्या शरीरातच साचू लागते. पण डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत केलेल्या मालिशने हे पाणी आणि घाण अंगात साचून राहत नाही ती बाहेर पाडण्यास मदत होते.
8) शरीरासाठी इतर फायदे – याचबरोबर अभ्यंगाचे म्हणजेच मालिशचे भरपूर फायदे आहेत. जसे –
दृष्टी सुधारते.
स्फूर्ती आणि सतर्कता वाढते.
शारीरिक शक्ती आणि बळ वाढते.
अभ्यंगस्नान करण्याची योग्य पद्धत –
तेल कोमट करूनघ्या आणि डोक्यापासून खालच्या अंगापर्यंत क्लॉक वाईज मालिश करत या. प्रत्येका अवयवाला ५ मिनिटे तरी दिल्याचं गेली पाहिजेत. यानंतर अर्धा तास हे तेल अंगात मुरू द्या. आणि मग अंघोळ करा. गाल, मान, पोट, तळपाय कोणताही अवयव अजिबात डावलूनका, सगळ्यांची योग्य मालिश करा. गर्भवती स्त्रियांनी, फ्रॅक्चर झालेल्यांनी आणि कोणती शारीरिक समस्या असलेल्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने अभ्यंगस्नान करावे.
अभ्यंगस्नानाचे तेल तयार करताना फायदे दुप्पट होण्याकरता तुम्ही त्यात हळद, कमळाचे मूळ, तुळशीची पानं आणि लवंग यापैकी काहीही घालू शकता. हे औषधी तेल तयार करण्याची कृती खालील प्रमाणे आहे.
थोडे तेल घेऊन ते गरम करायला ठेवा, आणि त्यात वरील सामग्री घाला. आणि २ मिनिटं गरम करून गॅसवरून काढून घ्या आणि २४ तासांसाठी ते बाजूला ठेऊनद्या. याने या सगळ्या समग्रीचे गुण त्या तेलात उतरतील. दुसऱ्यादिवशी हे तेल पातळ कापडाने गाळून घ्या. या अत्यंत गुणकारी अभ्यंगस्नानाचा फायदा करून घेण्यासाठी आपण रोज हे स्नान करू शकतो.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
