पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची बदली करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी (दि. 7) घेतला. डॉ राजेश देशमुख यांची बदली राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर डॉ. सुहास दिवसे यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सुहास दिवसे हे 2009 च्या बॅचचे आयएस् अधिकारी आहेत. त्यांनी पीएमआरडीए विकास आराखडा मार्गी लावण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. सुहास दिवसे यांनी यापूर्वी पीएमआरडीए आयुक्त, कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आकृतीबंध आणि नियमावली त्यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आली. तसेच पीएमआरडीएचा विकास आराखडा त्यांच्या कार्यकाळात प्रसिद्ध झाला. (Dr Rajesh Deshmukh Transferred Suhas Diwase Has Been Appointed As New District Collector Pune)
डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हाधिकारी पदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या वर्तुळाकार मार्गाच्या (पुणे रिंग रोड) भूसंपादनात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. प्रलंबित ई-फेरफार प्रकरणेही त्यांनी गतीने मार्गी लावली होती. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे कामही त्यांच्या कारकिर्दीत झाले होते.
अधिक वाचा –
– शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांनी तपासल्या 18 हजार ऑडिओ क्लिप, एकाला अटक । Sharad Mohol Murder Case
– राज्यातील जुणे महसूल कायदे बदलणार? महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल होणार? सरकारकडून समिती गठीत
– मावळ भाजपाचे विधानसभा क्षेत्रात ‘गाव चलो अभियान’ । Gaon Chalo Abhiyan by BJP