डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी केली आहे. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (25 डिसेंबर) केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने औरंगाबाद शहर व परिसरात आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते. ( Dr Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan Cleanliness Mission at Aurangabad through Chief Minister Eknath Shinde was present )
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या औरंगाबाद शहर स्वच्छता अभियानाचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते शुभारंभ. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार,आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, सचिन आणि राहुल धर्माधिकारी उपस्थित. pic.twitter.com/DR8Qts0YcD
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 25, 2022
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यातून सकारात्मक कृतीची प्रेरणा मिळते. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय केले हा विचार रुजविण्याचे मोठे कार्य धर्माधिकारी कुटुंबियांनी केले आहे. आज राज्यात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली असून गावे आणि शहरांसाठी यातून प्रेरणा मिळते. त्यातील नागरिकांचा मोठा सहभाग इतर हजारो नागरिकांसाठी प्रेरणा देणारा ठरत असून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाजासाठी दिपस्तंभासारखे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असून आज लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. हे सरकार आपले आहे ही भावना महत्वाची आहे. सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी चांगले काम करुया. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 74 हजार स्वयंसेवकांनी सहभागी होत 748 टन कचरा संकलन केला. या उपक्रमातून शहर स्वच्छ करण्यास मदत झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व सहभागी नागरिकांचे अभिनंदन केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान. समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य-स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानची अतुलनीय कामगिरी. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बाब- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे pic.twitter.com/mlrpNajQHO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 25, 2022
प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छता आणि वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत आवाहन केले. या स्वच्छता अभियानासाठी राज्यभरातून आलेले स्वयंसेवक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– रेल्वे विभागाची सुपरफास्ट कामगिरी, मळवली-कामशेत स्थानकांदरम्यान अवघ्या 5 तासात बांधला अंडरब्रीज
– ‘आधी पक्की घरे द्या, नंतरच राहत्या घरांना हात लावा, अन्यथा…’, किशोर आवारे यांचा प्रशासनाला इशारा