Dainik Maval News : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत इंद्रायणी नदीच्या घाटावर लोणावळा येथे व लोणावळा धरण विसर्जन घाट येथे सातव्या दिवशी व अनंत चतुर्थीच्या दिवशी निर्माल्य संकलन करण्यात आले. तिर्थरूप डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि तिर्थरूप डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये हे निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले.
प्रतिष्ठानचे डोंगरगाव, तुंगार्ली, कार्ला, देवले, अंबावणे,पवनानगर येथील 116 सदस्य या अभियानात सहभागी झाले. सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चाललेल्या या अभियानात 465 किलो निर्माल्य गोळा करण्यात आले. गोळा करण्यात आलेल्या निर्मल्यामधून प्लास्टिक व न कुजणारे घटक वेगळे करून उर्वरित निर्माल्याचे खत तयार करण्यात येणार असून हे खत प्रतिष्ठानतर्फे लागवड केलेल्या वृक्षांना घालण्यात येणार आहे. वाकसई चाळ येथे ही खत निर्मिती करण्यात येणार आहे.
निर्माल्य संकलनामुळे इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण रोखले जाईल. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अनेक ठिकाणी असे अभियान राबवले जाते. तसेच वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप, जल पुनर्भरण, रक्तदान शिबिर अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांतून प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असते असे यावेळी सांगण्यात आले.
इंदोरी व देहूरोड येथे देखील निर्माल्य संकलन :
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत इंद्रायणी नदीच्या घाटावर इंदोरी व देहूरोड येथे देखील श्री सदस्यांनी निर्माल्य संकलन केले. देहूरोड येथे 2 हजार किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.
याठिकाणी कामशेत, कान्हे, वडेश्वर, वडगाव, तळेगाव, इंदोरी, सोमाटणे, देहूरोड, चांदखेड, घोटवडे , हिंजवडी येथील 284 श्री सदस्य सहभागी झाले होते. तर इंदोरी घाटावर 1025 किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. याठिकाणी तळेगाव व इंदोरी येथील 43 श्री सदस्य सहभागी झाले होते. गणपती बाप्पांच्या गळ्यातील हार व इतर बाप्पानां वाहिलेली फुले असे हे निर्माल्य जमा करण्यात आले असून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार

