मावळ तालुका हा तसा डोंगर दऱ्यांचा तालुका. तालुक्यात डोंगराळ भागात असणारी गावांची आणि राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आजही अनेक गावातील नागरिक पाऊस, वारा आणि प्रतिकुल परिस्थितीत निसर्गाच्या कुशीत आपले जीवन जगत आहेत. काही गावे आजही वर्षानुवर्षे आधुनिक सेवा सुविधांपासून अलिप्त राहुन त्यांचे जीवनक्रमन करत आहेत. परंतू आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर हळूहळू तालुक्यातील अशा काही गावांपर्यंत सरकारमार्फत सेवा सुविधा पोहचत आहेत. ही ठिकाणे प्रकाशमान होत आहेत, तर काही ठिकाणी रस्ते, पाणी, आरोग्य अशा सुविधा उपलब्ध होताना दिसत आहेत.
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांनी आपल्या चालू पहिल्या टर्ममध्ये तालुक्यातील कानाकोपऱ्यात विज आणि पाणी, रस्ते पोहचतील, ह्यासाठी ध्येय ठेवले होते. त्यानुसार विविध योजनांद्वारे तालुक्यात पाण्याची कामे सुरु आहेत, काही पूर्ण झालीत. तर प्रत्येक गावात, वस्तीत, वाडीवर आणि घरात वीज पोहोचावी, ह्यासाठी आमदार सुनिल शेळके ह्यांनी कार्यक्रमपत्रिका बनवली असून त्यानुसार हेही काम मार्गी लागत आहे. आमदार सुनिल शेळके ह्यांच्यात प्रयत्नांनी आता मावळ तालुक्यातील आढले खुर्द गावातील पुरातन देवस्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिर इथे 45 वर्षांनंतर विजेचा दिवा झळकला आहे. ( due to efforts of MLA Sunil Shelke electricity reached khandoba temple in adhale khurd village )
आढले खुर्द इथे खंडोबा देवस्थानचे पुरातन मंदिर आहे. गेले 40 ते 45 वर्षे मंदिर परिसरात लाईटची आवश्यकता होती. आमदार सुनिल शेळके ह्यांचा दर सोमवारी वडगाव इथे मावळ तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार असतो. आढले खुर्द ग्रामस्थांनी 6 महिन्यांपूर्वी वडगाव येथील या जनता दरबारात मंदिराची ही गरज आमदारांच्या कानावर घातली. ग्रामस्थांनी लाईटच्या कामाचा पत्रव्यवहार केला आणि आमदार सुनिलआण्णांनी लगेच शब्द दिला. खंडोबा देवस्थान इथे लाईट पोहोचवण्याचे काम लवकर पूर्ण होईल, असे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण झाले आणि 45 वर्षांनंतर या ठिकाणचा परिसर उजाळला. आढले खुर्द ग्रामस्थांनी याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडून पवना धरणाचे जलपुजन; पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर इथे वृक्षारोपण
– रास्त भाव दुकान परवान्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, 1 सप्टेंबरपर्यंत मुदत । Pune News
– काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?