Dainik Maval News : इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्याला निसर्गाचं वरदान आहे. भरपूर पाऊस आणि पोषक वातावरणामुळे येथील बहुतांष शेतकरी खरीपात भाताचे पिक घेतात, त्यामुळे मावळला भाताचे कोठार म्हटले जाते. यंदाही मावळात जवळपास साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिक लागवड करण्यात आली असून सुयोग्य वातावरणामुळे भात पिक चांगले वाढीस लागले आहे.
मावळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. यातही डोंगर माथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने भात खाचरे भरून वाहत आहेत. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळत असून भात पिके चांगलीच तरारली आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे.
पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास मावळ तालुक्यासह मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव ही तालुके भात पिकांची तालुके म्हणून ओळखली जातात. या तालुक्यात अनेक शेतकरी विविध वाणाच्या भात लागवडी करतात. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने भाताची लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी चार सूत्री पद्धतीने लागवडी केल्या आहेत.
चालू वर्षी मे महिन्यापासून पावसाचे प्रमाण अधिक होते. परंतु सततच्या पावसामुळे रोपवाटिका टाकण्यास अडचणी आल्या होत्या. जूनच्या अखेरीस पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे भात लागवड वेळेवर झाल्या. ऑगस्ट महिन्यात महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना नवसंजीवनी मिळाली. यामुळे आता भात पिके चांगली तरारली आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्या, पाहा संपूर्ण नियोजन
– तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय ; आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक
– मोठा निर्णय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 48) बोरघाट भागात जड-अवजड वाहनांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश